मुंबई: किंग्स इलेव्हन पंजाबचा मेन्टॉर म्हणून जबाबदारी सांभाळणारा भारताचा माजी कसोटीवीर वीरेंद्र सेहवाग यंदाच्या आयपीएल मोसमात तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.


किंग्स इलेव्हनच्या क्रिकेट ऑपरेशन्स अँड स्ट्रॅटेजी या विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारीही सेहवागच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसंच किंग्स इलेव्हनच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसेडरच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे.

आयपीएलच्या आठव्या मोसमापासून सेहवागचं आणि किंग्स इलेव्हन पंजाबचं नातं जुळलं होतं. आता या फ्रँचाईझीचा मेन्टॉर आणि ब्रॅण्ड अॅम्बॅसेडरसह इतरही जबाबदाऱ्या सांभाळायला मिळणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया सेहवागनं व्यक्त केली आहे.