पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचं नियोजित स्मारक अर्थात शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी गिरगाव चौपाटीवर बांधण्याची मागणी होत आहे. ओबीसी संघर्ष समितीकडून ही मागणी करण्यात आली आहे.


शिवस्मारक गिरगाव चौपाटीवर हलवल्यास नियोजित खर्चातून उरलेल्या पैशांतून आत्महत्याग्रस्त शेतकरी तसंच आर्थिक दुर्बल गटातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे.

ओबीसी वर्गातल्या 188 जातींच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय राज्य मागासवर्गीय आयोगावर मागासवर्गीयांशिवाय इतर कुणाची सदस्य म्हणून नेमणूक होऊ नये अशीही मागणी करण्यात आली आहे.