कोहलीचा डीआरएस फसला, धोनी हसला
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 10:10 AM (IST)
कोलकाता : डीआरएसपेक्षा आपल्याला धोनीवर विश्वास आहे, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी म्हणाला होता. त्याचा अनुभव पुणे आणि कटक वन डेत आलाही. मात्र कोलकाता वन डेत विराटने धोनीला न विचारता घेतलेला रिव्ह्यू अयशस्वी ठरला. कोलकाता वन डेत 28 व्या षटकात जसप्रित बुमरा गोलंदाजी करत असताना हा अनुभव आला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन खेळत असताना धोनीच्या हातात त्याचा एक झेल गेला. मात्र धोनी आणि बुमराने अपील करुनही पंचांनी कोहलीला अपेक्षित निर्णय दिला नाही. त्यामुळे त्याने डीआरएस घेतला. मात्र हा डिआरएस अयशस्वी ठरला.