मुंबई काँग्रेसमधील वाद सोडवण्यासाठी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांची नेमणूक, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची माहिती


-----------------------

1. शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्ताव आला तरच युतीसंदर्भात चर्चा, वर्षावरच्या बैठकीत भाजप नेत्यांची तीव्र नाराजी, आता उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा

-----------------------

2. स्वतंत्र लढण्यासाठी शिवसैनिकांना तयार राहण्याचे आदेश , सुत्रांची माहिती, तर युतीच्या चर्चेची वेळ निघून जात असल्याची उद्धव ठाकरेंकडून आठवण

-----------------------

3. भाजप आमदार राम कदमांच्या भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा, दिलीप कदमांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा नगरसेवक हारुन खान यांचा आरोप

-----------------------

4. ठाणे, उल्हासनगरमध्येही मालमत्ता करात सूट देऊ, मतांचा जोगवा मागताना शिवसेनेची घोषणा, ठाणेकरांना धरण आणि पार्कचं, तर विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवासाचं आश्वासन

-----------------------

5. तामिळनाडूत जलिकट्टूदरम्यान तिघांचा मृत्यू, सरकारच्या अध्यादेशानंतरही आंदोलन सुरुच, कायमस्वरूपी कायदा करण्याची मागणी

-----------------------

6. केदार जाधवची प्रयत्नांची शर्थ पण टीम इंडियाच्या पदरी अपयश, कोलकाता वन डेत इंग्लंडचा पाच धावांनी विजय

-----------------------

एबीपी माझा वेब टीम