मुंबई : भारतीय क्र‍िकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. क्रिकेटच्या मैदानावरील दमदार कामगिरीनंतर विराट आता अॅक्शन अवतारात दिसणार आहे. विराट कोहली नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे आणि त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.


विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचंच निमित्त साधत विराटने त्याच्या नव्या लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे. पण हे पोस्टर नेमकं कशाचं आहे हे मात्र विराटने गुलदस्त्यात ठेवलं आहे. 28 सप्टेंबरला या पोस्टरचा खुलासा होणार आहे. विराटच्या आगामी सिनेमा किंवा डॉक्युमेंटरीचं हे पोस्टर असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

विराट कोहलीने 'ट्रेलर द मूव्ही' मधील त्याचा लूक ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात तो अॅक्शन लूकमध्ये दिसत आहे. "दहा वर्षानंतर आणखी एक पदार्पण, कान्ट वेट," असं कॅप्शन विराटने या पोस्टरला दिलं आहे.


दुसरा अंदाज
व‍िराट कोहलीचं हे पदार्पण सिनेमासाठी नाही तर त्याच्या ब्रॅण्डसाठी असल्याचीही चर्चा आहे. विराटचा wrogn.in हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे.  wrogn.in या वेबसाईटवर विराट कोहलीच्या वॉर्डरोबपासून प्रेरित असलेल्या कपड्यांची विक्री होते. आता विराट trailerthemovie.com वर कपड्यांची विक्री करणार असून 28 सप्टेंबरला ही वेबसाईट लॉन्‍च‍ होणार असल्याचं म्हटलं जात आहे.