मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर सध्या टीकेची झोड उठवण्यात येत आहे. इंग्लंडसोबतच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्याच कसोटी सामन्यात भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव झाला, त्यामुळं अनेक क्रीडारसिकांची निराशा झाली. त्यातही काही खेळाडूंना रोषाचा सामनाही करावा लागला. विराटही त्यापैकीच एक असल्याचं पाहायला मिळालं.
एकिकडे हा पराभव पचवत असतानाही विराटची नजर आहे ती म्हणजे येत्या काही दिवसांनीच सुरु होणाऱ्या आयपीएलच्या नव्या अर्थात 14 व्या हंगामावर. IPL 2021 च्या 14 व्या हंगामाला एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठीसुद्धा खेळाडू आणि संघ व्यवस्थापनं कामाला लागली आहेत.
सध्या बंगळुरूच्या संघाकडून यासाठी पावलंही उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून, एका खास व्यक्तीला पाचरण करण्यात आल्याचं कळत आहे. या व्यक्तीच्या येण्यामुळं आणि त्यांच्या सल्ल्यामुळं विराटला संघाची कामगिरी सुधारण्यात आणखी यश मिळेल असंच चित्र दिसत आहे.
Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या हिमवीरांकडून शोधमोहिम
फलंदाजी प्रशिक्षक, सल्लागार म्हणून भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2021 या हंगामासाठी ते संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळतील. बंगळुरूच्या संघातील क्रिकेट ऑपरेशन्स संचालकपदी असणाऱ्या Mike Hesson आणि मुख्य प्रशिक्षक Simon Katich यांची साथ त्यांना लाभणार आहे. याव्यतिरिक्त संघाला फलंदाजी, गोलंदाजी, फिरकी गोलंदाजीमध्ये मोलाचं सहाय्य करण्यासाठी श्रीधरन श्रीराम आणि अॅडम ग्रिफिथ, शंकर बासू हेसुद्धा संघाशी जोडले गेले आहेतच.
बांगर यांच्याविषयी सांगावं तर, 2014 मध्ये भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षपकदी त्यांची निवड करण्यात आली होती. 2019 मधील विश्वचषकापर्यंतते ही भूमिका बजावताना दिसले. बंगळुरूशी जोडलं जाण्यापूर्वी बांगर यांनी किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. 2014 मध्ये त्यांची निवड सहाय्यक प्रशिक्षकपदी करण्यात आली होती, ज्यानंतर संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर त्यांना मुख्य प्रशिक्षपदी बढती मिळाली होती. त्यामुळं आता बांगर यांच्या येण्यानं विराटला नेमकी कशी मदत होते आणि संघाला त्याचा किती फायदा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.