मोहाली: मोहालीत न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं 150 धावांची नाबाद खेळी साकारुन टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.


सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, 'मला महिती आहे की, विरोधी संघ मला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतं, यासाठी मी खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी थोडा वेळ घेतला. सामन्यानुसार मी खेळत राहिलो आणि शेवटी मोठे फटके मारले.'

'सुरुवातीलाच रॉस टेलरनं माझा झेल सोडला. त्यामुळे मला थोडी नशीबाचीही साथ मिळाली. पण मला रॉस टेलरचं दु:ख वाटतं. झेल सोडणं कायम त्रासदायक ठरतं. माझ्यासोबतही असंच झालं होतं. मी वेलिंग्टनमध्ये ब्रॅण्डेन मॅक्युलमचा झेल सोडला. त्यानंतर त्यानं. 300 धावा केल्या होत्या." असं सामनावीर कोहली म्हणाला.

'मला धोनी आणि मनीषची चांगली साथ मिळाली. धोनीनं वरच्या क्रमांकावर खेळायला येण्याचा निर्णय घेतला. मैदानावर येताच त्यानं मला आत्मविश्वास दिला. मनीषने देखील मैदानात येताच काही चांगले फटके मारले. जेणेकरुन माझ्यावरील दबाव कमी झाला.' असंही कोहली म्हणाला.

विराटनं या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी तर केलीच, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भक्कम भागीदारीही रचली. धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूंत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला.

संबंधित बातम्या:

टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात