मुंबई: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यतत्परतेचं पुन्हा एक उदाहरण पुढे आलं आहे. रेणुका शहाणे यांच्या नणंदेला सुरेश प्रभूंच्या एका ट्वीटमुळे तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.


रेणुका शहणे यांची नणंद आणि कलाकार आशुतोष राणा यांच्या बहीण सुविधा एक्स्प्रेसनं प्रवास करत होती. त्यावेळी त्यांच्या छातीत त्रास होऊ लागल्यानं त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज होती.

त्यामुळे रेणुका शहाणे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्विटर अकांऊटवर ट्वीट केलं. यानंतर अवघ्या 15 मिनिटातच रेल्वे प्रशासन कामाला लागलं आणि डॉक्टर पोहोचेल, व त्यांनी वैद्यकीय उपचाराला सुरुवात केली.

दरम्यान, रेणुका शहाणेंनी यावरुन रेल्वे मंत्र्यांसोबत प्रशासनाचेही आभार मानले आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाचे कौतुकही केलं आहे.