मुंबई : लग्नानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्यांपासून, क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारही शुभेच्छा देण्यात मागे राहिले नाहीत. पण विराटने आपल्या एका विवाहित क्रिकेटर मित्राकडून लग्नानंतरच्या टिप्स मागितल्या आहेत.

विरुष्काला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेचाही समावेश होता. अजिंक्यने ट्वीट करुन विराट आणि अनुष्काला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. "नव्या प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा. क्लबमध्ये तुझं स्वागत, कॅप्टन," असं ट्वीट अजिंक्यने केलं.

अजिंक्यच्या शुभेच्छांवर विराटनेही मजेशीर उत्तर दिलं. "धन्यवाद जिंक्स, तुझ्या टिप्सची वाट पाहत आहे," असं विराटने लिहिलं आहे.

https://twitter.com/imVkohli/status/940984863695437825

दरम्यान, विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनी इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं असलं तरी भारतात ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत विराट आणि अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आहे.

संबंधित बातम्या

रोममध्ये हनीमून, 'विरानुष्का'चा लग्नानंतरचा पहिला भन्नाट सेल्फी

'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं

विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?

पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा

VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!