मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सातव्या आसमांवर आहे. सुट्टीवर असलेल्या विराटने गुरुवारी पहिल्यांदाच त्याच्या मुंबईतील नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली.


मुंबईतील गगनचुंबी इमारतीमध्ये असलेल्या घरातून समुद्राच्या नयनरम्य दृश्याचा सुंदर फोटो त्याने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.


विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. त्यानंतर हे जोडप्याने मुंबईतील नव्या घरात प्रवेश केला.

समुद्रकिनारी असलेलं वरळीतील हे घर तब्बल 7,171 चौरस फुटांचं आहे. विराटने  2016 मध्ये 34 कोटी रुपयांमध्ये हे घर खरेदी केलं होतं.

काही दिवसांपूर्वी विराटने नव्या घरात कॉफी पितानाचा फोटो शेअर केला होता. "स्वत:च्या घरातील कॉफीची चव आणखी उत्तम असते," असं कॅप्शन त्याने हा फोटो शेअर करताना दिलं होतं.