मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आलंय.


रंशशारदा सभागृहात थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. 12 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी याच दिवशी शिवतीर्थावर सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली होती.

त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 13 आमदार निवडून आणत कमाल करुन दाखवली. शिवाय नाशिक पालिकेत एकहाती सत्ता आणली. तर पुणे, मुंबई, खेडसह अनेक पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नगरसेवकही निवडून आले.

मात्र त्यानंतर राज यांचा करिश्मा कायम राहिला तरी पक्षाला त्याचा फायदा झाला नाही, कारण 2014 ला आमदारांची संख्या 13 वरुन 1 वर आली. नाशिकमधली सत्ता गेली. बरेच नेते सोडून गेले. त्यामुळे आता पक्षात प्राण फुंकण्याचं नवं आव्हान एका तपानंतरही कायम आहे.