कर्णधारपदामुळे धावांची भूक वाढली : विराट कोहली
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2017 05:38 PM (IST)
हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत झळकावलेल्या द्विशतकानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथं द्विशतक ठोकण्याचा मान मिळवून दिला. विराटनं आपल्या यशाचं श्रेय कर्णधारपदाच्या वाढत्या जबाबदारीला दिलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आल्यापासून आपली धावांची भूक वाढली असल्याचं विराटनं सांगितलं. कोहली, तू साहाचं ऐकायला हवं होतं! समाधानी वृत्ती कमी झाल्यानं, आपण सलग चार कसोटी मालिकांमध्ये चार द्विशतकं ठोकू शकलो, असंही तो म्हणाला. गेल्या दोनतीन वर्षांमध्ये उंचावलेल्या फिटनेसचाही आपल्याला लाभ होत असल्याचं त्यानं नमूद केलं. फिटनेस वाढल्यानं आता मी लवकर थकत नाही, त्यामुळं मोठ्या खेळी करण्याकडे माझा कल असतो, असंही तो म्हणाला. संबंधित बातम्या पार्थिव पटेल की रिद्धीमान साहा? उत्तर शतकाने दिलं कोहली, तू साहाचं ऐकायला हवं होतं! VIDEO : अर्धशतकानंतर जाडेजाची ‘तलवारबाजी’ ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित