नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावला असला तरी महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुकीला मोदी येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.


एबीपी माझाने याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांना विचारणा केली. मात्र त्यावर जावडेकरांनी मौनच बाळगणं पसंत केलं.

भाजपनं महाराष्ट्रात अनेक गुंडांना प्रवेश दिल्यानं सातत्यानं टीका होत आहे. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात सभा घेणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

यापूर्वी मुंबई आणि अन्य स्थानिक निवडणुकात शिवसेना-भाजप युती नव्हती. तरीही भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. यावेळीही आम्ही निर्विवाद वर्चस्व मिळवू. आम्हाला बहुमत मिळेल याची खात्री आहे. लोकांना परिवर्तन आणि पारदर्शकता हवी आहे, असं जावडेकर म्हणाले. मात्र मोदी मुंबईत सभेला येणार का, याबाबत प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं.