कसं खेळायचं, हे धोनीला सांगण्याची गरज नाही : कोहली
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2017 09:16 PM (IST)
जमैका : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज 36 वा जन्मदिवस आहे. धोनीला त्याच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. तर टीम इंडियाने आणि कर्णधार विराट कोहलीनेही त्याला खास गिफ्ट दिलं. जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका 3-1 ने जिंकून टीम इंडियाने माहीला खास गिफ्ट दिलं. सामना संपल्यानंतर कोहलीने धोनीच्या टीकाकारांनाही सडेतोड उत्तर दिलं.