मुंबई: मोबाइल कंपनी मोटोरोलानं 25 जुलैला एक इव्हेंट आयोजित केला आहे. याच इव्हेंटमध्ये कंपनी आपला नवा स्मार्टफोन मोटो Z2 किंवा मोटो X4 लाँच करु शकतं. हा इव्हेंट न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. तर दुसरीकडे 12 जुलैला भारतात मोटो E4 प्लस लाँच होणार आहे.


मोटो X4 आणि मोटो Z2 या स्मार्टफोनबाबतचे  अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत.

लीक रिपोर्टनुसार, मोटो X4 मध्ये 5.2 इंच स्क्रीन असेल तर मोटो Z2 मध्ये 5.5 इंच स्क्रीन असेल. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगटवर आधारित असणार आहेत. मोटो Z2 मध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम चिपसेट स्नॅपड्रॅगन 835 असू शकतं. तर मोटो X4  मध्ये क्वॉलकॉम चिपसेट स्नॅपड्रॅगन 630 असण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम असेल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मोटो X4 मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप असेल. यामध्ये एक लेन्स 12 मेगापिक्सल तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सल असणार आहे. तर यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल. मोटो Z2 मध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असू शकतं.

12 जुलैला मोटो E4 प्लसचं भारतात लाँचिंग

मोटो E4 प्लस हा स्मार्टफोन भारतात 12 जुलैला लाँच होणार आहे. E4 प्लस 179 डॉलरला (जवळजवळ 11,600 रुपये) ग्लोबली लाँच करण्यात आलं होतं. यामध्ये 5.5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्यूलेशन 720x1280 पिक्सल आहे. 1.4 Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून 2 जीबी रॅमही आहे. तसेच यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.