विराटने लंडनमध्ये दाखल होताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केला. ज्याने विराटचा लूक बदलला, तो हेअरड्रेसर या फोटोमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना विराटने हेअरस्टायलिस्टचे आभारही मानले आहेत.
हा हेअरस्टायलिस्ट म्हणजे आलिम हाकिम, ज्याने काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमचं मुंडन केलं होतं.
आलिमकडूनही विराटचं कौतुक
आलिम हाकिम बॉलिवूडचा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे. त्याच्या क्लायंट लिस्टमध्ये हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि वरुण धवन यांचा समावेश आहे. आलिमनेही आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला आहे. 'भारताचा अभिमान' या शब्दात आलिमने विराटवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शिवाय त्याच्या फॅशन आणि स्टाईलचंही कौतुक केलं आहे.
केस कापण्यासाठी 20 हजार रुपये!
आलिम हाकिमच्या हायप्रोफाईल सलूनमध्ये केप कापण्याची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत आहे. आलिमचे वडील हाकिम कैरानवी भारताचे पहिले सेलिब्रिटी हेअरड्रेसर होते. ते दिलीप कुमार, सुनील दत्त, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे हेअरड्रेसर होते. आलिमही वयाच्या 16 व्या वर्षात या व्यवसायात दाखल झाला. मुंबई, हैदराबादशिवाय दुबईमध्येही आलिमचं सलून आहे.