मुंबईः भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कोहलीची सीएट सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोहलीने आयपीएल 2016 मध्ये अनेक रेकॉर्ड मोडित काढत चार शतकांसह 16 सामन्यात सर्वोत्कृष्ट 973 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माला या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाज तर भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या वर्षातील सीएट पुरस्कारः
विराट कोहली (भारत)- सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू
दिलीप वेंगसरकर (भारत)- जीवन गौरव पुरस्कार
जो रुट (इंग्लंड) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू
जो रुट (इंग्लंड) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फलंदाज
आर. अश्विन (भारत) - सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोलंदाज
रोहित शर्मा (भारत)- सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू
केन विल्यम्सन (न्यूझीलंड)- सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू
मार्टीन गप्टील (न्यूझीलंड) - सर्वोत्कृष्ट वन-डे खेळाडू
श्रेयस अय्यर (भारत)- सर्वोत्कृष्ट देशांतर्गत खेळाडू
वृषभ पंत (भारत)- सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू
अजिंक्य रहाणे (भारत)- विशेष पुरस्कार