मुंबई : एक जूनपासून देशात मोबाईल, वीज, पाणी यासारख्या अनेक सेवा महाग होणार आहेत. उद्यापासून अर्धा टक्का कृषी कल्याण सेस लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ होणार आहे.

 

कृषी कल्याण सेस उद्यापासून लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर जाणार आहे. मोबाईल, डीटीएच, वीज, पाणी यांचं बिल, रेस्टॉरंटमधील जेवण, रेल्वे आणि विमानाचं तिकीट, बँकिंग, विमा सेवा महागणार आहेत. बँक ड्राफ्ट, फंड ट्रान्सफर, एसएमएस अलर्ट, चित्रपट, स्पा, सलून, पार्लर यासारख्या सेवाही महागतील.

 
मोदी सरकारने बजेटच्या वेळीच 0.5 टक्के कृषी कल्याण सेस लागू करण्याची घोषणा केली होती. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. एका वर्षात सेसच्या माध्यमातून सरकार 1.16 लाख कोटी रुपयांची कमाई करते.