मुंबई: अनेकवेळा आपण बाहेर पावभाजी, सॅण्डविच वगैरे खातो. त्यासाठी बटर किंवा लोणी वापरलं जातं. पण खरंच ते बटर असतं का?
बाजारात आपल्याला लाईट बटर मिळते. सर्वसामान्य बटरमध्ये कोलेस्ट्रोरॉल असते, त्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते, म्हणून लाईट बटर विकलं जातं. वजन वाढ टाळण्यासाठी लाईट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे लाईट बटर आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का ? ते खाल्ल्यामुळे काय होतं? त्यावर एक नजर
मार्जरीन एक असा पदार्थ आहे, जो बटरसारखाच दिसतो, पण वास्तवात ते बटर नसते. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मार्जरीन म्हणजे नक्की आहे तरी काय ?
मार्जरीन हा वनस्पती तेलापासून बनिवण्यात आलेला पदार्थ आहे. वनस्पती तेलाला आपल्याकडे डालडा म्हणूनही ओळखलं जातं. ज्याची आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याचं मुख्य कारण म्हणजे ते स्वस्त असते. त्यामुळे ग्राहकदेखील ते लगेच खरेदी करतात. विशेष म्हणजे, यातून विक्रेत्याला चांगला नफा मिळत असल्याने; तो देखील याच्याकडे पैसा कमवण्याचं साधन या दृष्टीकोनातून पाहतो. पण याचे आपल्या आरोग्याला काय फायदे आणि तोटे आहेत ? त्यावर एक नजर..
1) मार्जरीन हे बटर नसल्यामुळे त्यापासून आपल्या आरोग्याला काहीच लाभ मिळत नाहीत.
2) मार्जरीन वनस्पती तेलापासून बनविण्यात येत असल्यामुळं त्यात कोलेस्ट्रॉल नसतं. पण बटरसारखे दिसावे म्हणून यात अनेक केमिकल वापरले जातात,ज्याचा आपल्या ह्रदयावर थेट परिणाम होतो.
3). मार्जरीन हे गर्भवती महिला किंवा लहान मुलांसाठी अपायकारक आहे. कारण त्यांना नैसर्गिक पद्धतीनेने तयार केलेल्या बटरची अवश्यकता असते.
4). मार्जरीन हे वनस्पती तेल असल्याने अनसॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणावर असतात.
5)मार्जरीन बनवताना उच्च तापमानाचा वापर केला जात असल्याने वनस्पती तेलामधील जीवनसत्त्वे निघून जातात.
6). यामध्ये ट्रान्स फॅट असिडचे प्रमाण जास्त असल्याने याच्या सेवनाने शरिरातील असिडचे प्रमाण वाढण्यास मदत होते.