मुंबई : आयपीएलच्या सामन्यात गुजरात लायन्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा नव्या लूकमध्ये दिसला. सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे, विराट कोहली रवींद्र जाडेजाच्या नव्या लूकची थट्टा करत असल्याचं दिसत आहे.


नव्या लूकमध्ये जाडेजाचे केस आधीपेक्षा लहा आणि दाढी-मिशीही नव्या स्टाईलमध्ये दिसत आहे. याआधी त्याचे केस कुरळे आणि मोठे होते.

सामन्यानंतर आयपीएलच्या वेबसाईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली, गुजरात लायन्सचा प्रवीण कुमार आणि रवींद्र जाडेजा थट्टा-मस्करी करताना दिसत आहेत. तर विराट कोहली जडेजाच्या दिशेने हात करत हसत आहे.

विराट कोहलीच्या हसण्याचं कारण तर समजू शकलेलं नाही. पण त्याच्या हसण्यावरुन असं वाटतंय की, जणू जाडेजाचा नवा लूक कोहलीला फारच मजेशीर वाटला. त्यामुळेच तो त्याची थट्टा करत आहे.

दरम्यान, राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरुने गुजरात लायन्सवर 21 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 213 धावा केल्या. गेलने 77 आणि विराटने 64 धावांची खेळी रचली. उत्तरादाखल गुजरात लायन्सचा डाव 192 धावांवर आटोपला. जाडेजाने 29 धावा केल्या.