मुंबई: जागतिक क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच विराट एका टॅटू पार्लरमध्ये दिसला. कोहलीने आणखी एक नवा टॅटू त्याच्या शरिरावर गोंदला आहे. हा त्याच्या अंगावरचा नववा टॅटू आहे.



गेल्या वर्षी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधणाऱ्या विराटने, जागतिक मीडियाचं लक्ष वेधलं होतं. आता विराटचा मैदानाबाहेर वावर लक्ष वेधून घेत आहे.

सध्या टीम इंडिया टी ट्वेण्टी तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे कोहली सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

नुकतंच विराट कोहली विमानतळावर दिसला. त्यावेळी त्याच्या हातातील वॉलेटने लक्ष वेधून घेतलं. विराटच्या हातात Louis Vuitton Zippy XL ब्रँडचं वॉलेट होतं.

मुली किंवा महिलांच्या हातात ज्याप्रमाणे पर्स असते, अगदी त्याचप्रकारचं वॉलेट किंवा पर्स/पाकीट कोहलीच्या हातात होतं.

कोहलीच्या या वॉलेटमध्ये इतकं खास काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याची खासियत म्हणजे त्याची चक्रावून टाकणारी किंमत. कोहलीच्या या वॉलेटची किंमत सुमारे 1250 डॉलर म्हणजेच जवळपास 81 हजार 144 रुपये इतकी आहे.

या वॉलेटमध्ये मोबाईल, पासपोर्ट, चाव्या असं साहित्य ठेवता येतं.

संबंधित बातम्या

कोहलीच्या अंगावर नववा टॅटू, नव्या टॅटूचा अर्थ काय? 

टी-20 तिरंगी मालिका आजपासून, टीम इंडिया श्रीलंकेशी भिडणार