मुंबई : पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन’ला विराटने खास भेट दिली. आपली स्वाक्षरी असलेली बॅट विराटने आफ्रिदीच्या फाऊंडेशनला भेट म्हणून दिली. याबद्दल आफ्रिदीने ट्विटरवरुन विराटचे आभार व्यक्त केले.
क्रिकेट हा खेळ देशांच्या सीमा पार करणारा आहे. हे पुन्हा एकदा विराट कोहलीने आपल्या कृतीतून दाखवलं आहे. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानात ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन’ नावाची समाजसेवी संस्था चालवतो. या संस्थेला विराटने स्वाक्षरी केलेली बॅट भेट दिली.
याबद्दल शाहिद आफ्रिदीने ट्विटरवरुन आभार व्यक्त करताना लिहिले की, “विराट, एसए फाऊंडेशनला पाठिंबा देण्यासाठी तुझे आभार.”
https://twitter.com/SAfridiOfficial/status/892343260034850816
याआधी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतली, त्यावेळी टीम इंडियाने त्याला कोहलीचं शर्ट भेट दिलं होतं, ज्यावर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या होत्या. लंडनमध्ये ज्यावेळी याच शर्टचा तीन लाख रुपयांना लिलाव झाला, त्यावेळी विराट कोहलीने म्हटलं होतं, शाहिदभाई तुला शुभेच्छा. तुझ्याविरोधात खेळणं कायमच सुखद अनुभव राहिला.”
एकंदरीतच शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहली यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र, त्या मैत्रीपलिकडे जात सामाजिक कामांसाठीही विराटने कायमच हातभार लावला आहे.
…आणि शाहिद आफ्रिदीने विराटला ‘थँक यू’ म्हटलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 08:53 AM (IST)
पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन’ला विराटने खास भेट दिली. आपली स्वाक्षरी असलेली बॅट विराटने आफ्रिदीच्या फाऊंडेशनला भेट म्हणून दिली. याबद्दल आफ्रिदीने ट्विटरवरुन विराटचे आभार व्यक्त केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -