मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार आहे. त्यामुळे पीक विम्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट नसून, 4 ऑगस्ट आहे. सरकारने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.
याआधी म्हणजे 31 जुलै 2017 रोजी सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढवली होती. मात्र, 1 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित शासन निर्णय सरकारने जारी केला आणि 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढवल्याचे जाहीर केले.
बिगर कर्जदार शेतकरी 4 ऑगस्टपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने पीक विम्याच्या पोर्टलवर अर्ज भरु शकतात किंवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जही स्वीकारले जातील. याचसोबत शेतकऱ्यांकडे 31 जुलै किंवा त्यापूर्वीचं पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, बँका शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारू शकणार नाहीत. सरकारच्या जनसुविधा केंद्रांवर अर्ज स्वीकारले जातील.
कर्जदार शेतकऱ्यांचा विमा नियमित प्रक्रियेनुसार भरला जातो.
याआधी पीक विम्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2017 ही होती. मात्र, बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या, त्याशिवाय ऑफलाईन-ऑनलाईनच्या घोळामुळे आणखीच अडथळे निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली आहे.
संबंधित बातमी :
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक
पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 07:43 AM (IST)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरता येणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -