Virat Kohli Anushka Sharma: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohali) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट फारसा काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता कोहलीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, विराट लवकरच आपल्या कुटुंबासह लंडनला (London) शिफ्ट होणार असून याला त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. कोहली भारत सोडण्याचा विचार करत आहे.
कोहली आणि अनुष्का (Anushka Sharma) लंडनला शिफ्ट झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पहिल्यांदाच विराट कोहलीशी संबंधित व्यक्तीनं यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवाय उंचावल्या आहेत. विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी नुकतीच दैनिक जागरणला मुलाखत दिली. त्यावेळी मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, "विराट मुलं आणि पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे..."
कुठे असेल विराट कोहलीचं नवं घर?
विराट कोहलीचं एक घर दिल्लीमध्ये आहे, तर एक घर मुंबईत आहे. मुंबईमद्ये विराटनं एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं. यासोबतच अलिबागमध्ये विराटचा एक बंगला देखील आहे. व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी विराटनं अलिबागमध्ये बंगला खरेदी केला होता. पण, आता विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा भारत सोडण्याच्या विचारात आहे. विराट कोहलीचं नवं घरं लंडनमध्ये असेल. पण, याबाबत विराटनं आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोहलीच्या घराची किंमत काय?
विराट कोहली त्याच्या लग्झरी लाईफमुळे चर्चेत असतो. कोहलीच्या मालकीची सर्व घरं महागडी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीचा सर्वात महागडा बंगला गुरुग्राममध्ये आहे. हे घर DLF फेज 1 मध्ये आहे, ज्याची अंदाजे किंमत 80 कोटी रुपये आहे. तर मुंबईत एका अपार्टमेंटची किंमत जवळपास 34 कोटी रुपये आहे. अलिबागच्या बंगल्याची किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
विराटला लंडनला का शिफ्ट व्हायचंय?
प्रशिक्षकानं कोहलीच्या तंदुरुस्तीचं आणि कामाच्या नैतिकतेचं कौतुक केलं आहे. तसेच, विश्वास व्यक्त केला की, क्रिकेटपटूकडे आगामी काही वर्षांत खेळण्यासाठी बरंच काही आहे. कोहलीचं क्रिकेट भवितव्य सुरक्षित असल्याचं दिसत असताना, परदेशात स्थलांतरित होण्याच्या त्याच्या कथित निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट जगतातही उत्सुकता निर्माण झाली आहे.