नवी दिल्ली : टीम इंडियाची ऑफिशिअल किट स्पॉन्सर कंपनी नायकेवर खेळाडू नाराज असल्याचं वृत्त आहे. नायकेच्या किटसोबत खेळणं अशक्य झाल्याचं खेळाडूंचं म्हणणं आहे. खेळाडूंनी याबाबत बीसीसीआयकडेही तक्रार केली आहे.
बीसीसीआयनेही खेळाडूंची ही तक्रार गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी नायकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाणार आहे.
नायके जानेवारी 2006 पासून टीम इंडियाची अधिकृत किट स्पॉन्सर आहे. नायकेने 2016 मध्ये बीसीसीआयसोबत 370 कोटी रुपयांचा करार केला आहे, जो 2020 पर्यंत असेल.
नायकेचा बीसीसीआयसोबतचा करार 1 जानेवारी 2016 रोजी झाला, जो 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कायम असेल. नायकेकडून भारताच्या एका सामन्यावर 87 लाख 34 हजार रुपये खर्च केले जातात.