मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व सामने जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरु, असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा विश्वास व्यक्त केला.


1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया बुधवारी रवाना होणार आहे. त्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना चाहत्यांसाठी नेहमीच रोमांचक असतो. मात्र आमच्यासाठी इतर सामन्यांप्रमाणेच असेल, असंही विराट म्हणाला. 4 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत होणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह या अनुभवी खेळाडूंची उपस्थिती महत्वपूर्ण ठरेल, असंही विराटने सांगितलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे.

पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

  • ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड

  • ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2017च्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

  • जून 1:  इंग्लंड Vs बांगलादेश

  • जून 2:  ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड

  • जून 3:  श्रीलंका Vs दक्षिण अफ्रिका

  • जून 4:  भारत Vs पाकिस्तान

  • जून 5:  ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश

  • जून 6:  न्यूझीलंड Vs इंग्लंड

  • जून 7:  पाकिस्तान Vs दक्षिण अफ्रिका

  • जून 8:  भारत Vs श्रीलंका

  • जून 9:  न्यूझीलंड Vs बांगलादेश

  • जून 10:  इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया

  • जून 11:  भारत Vs दक्षिण अफ्रिका  

  • जून 12:  श्रीलंका Vs पाकिस्तान

  • जून 14:  पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)

  • जून 15:  दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)

  • जून 18:  अंतिम सामना


संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!