ना अनुष्का, ना फलंदाजी, ना फॉर्म, विराटला वेगळीच चिंता
पण आता हेच मानधनाचे पैसे कसे सेव्ह करावेत याची चिंता विराटला सतावते आहे. त्याने नुकत्याच डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भिती व्यक्त केली आहे. तो म्हणतो की, मोठमोठ्या दिग्गजांना मी दिवाळखोर होताना पाहिले आहे. त्यामुळे आता मी कमावलेले हे पैसे कसे सेव्ह करावेत, याची चिंता मला सतावते आहे.
विराट कोहलीची वर्षाची कमाई सुमारे 13 कोटी रूपये आहे. क्रीडा जगतातील कमाईचा हा विक्रम आहे.
नुकत्याच एका इंग्लिश वेबसाईटने प्रकाशित केलेल्या जगातील सर्वात्कृष्ट अॅथलिट्सच्या यादीत विराट आठव्या क्रमांकावर आहे.
याशिवाय त्याने कमाई आणि मानधनात सर्व क्षेत्रातील दिग्गजांना मागे टाकलं आहे.
सध्या क्रिकेट तज्ज्ञांकडून विराट कोहलीच्या खेळीमुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या नवव्या हंगामातही, त्याने सर्वाधिक 973 धावा ठोकण्याचा रेकॉर्ड केला.
जबरदस्त फॉर्ममुळे भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार आणि टीम इंडीयाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली सर्वांच्याच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. पण सध्या त्याला एका गोष्टीची चिंता सतावतेय.