यू टेलिव्हेंचर्सचा Yu Yunicorn स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्टवर
Yu Yunicorn फोनचे दोन्हीही कॅमेरा याचे खास आकर्षण आहेत. यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर सेल्फिसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Yu Yunicorn मध्ये 5.5 इंच आकाराची मिराव्हिजन 2.0 ही एचडी स्क्रिन आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे.
Yu Yunicorn ची किंमत एका महिन्यासाठीच 12 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी स्मार्टफोन प्रेमींची या फोनवर उडी पडणार आहे.
Yu Yunicorn फोन मेटल बॉडीमध्ये उपलब्ध असून यामध्ये फिचर्स देखील जबरदस्त देण्यात आले आहेत. यामध्ये मीडिया टेक हेलिओ P10 हे प्रोसेसर असून 4GB ची रॅम तेसच 32GB चे स्टोअरेज आहे.
या फोनच्या किंमतीत एका महिन्यानंतर वाढ होणार असून 13 हजार 499 रुपये एवढी असणार आहे.
या बजेट स्मार्टफोनची किंमत केवळ 12 हजार 999 रुपये असून यू टेलिव्हेंचर्स कंपनीचा एवढ्या कमी किंमतीचा हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा फोन आज दुपारी 2 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
यू टेलिव्हेंचर्स या कंपनीचा Yu Yunicorn हा फ्लॅगशिप स्मार्टफोन उद्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.