महिलांना मासिक पाळी हा शाप नाही : करीना
मासिक पाळी आणि लैंगिक शिक्षणावर जाहीर चर्चा झाली पाहिजे, असं मत बॉलिवूडची अभिनेत्री आणि युनिसेफची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करीना कपूरने व्यक्त केलं. मासिक पाळी स्वच्छता अभियानासाठी करीना लखनौमध्ये दाखल झाली होती. यावेळी बोलताना करीना म्हणाली की महिलांना मासिक पाळी शाप नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासिक पाळी स्वच्छतेबाबत मुलींनी त्यांच्या पालकांसोबत खुलेपणे चर्चा करायला हवी. यामुळे त्यांनाही समजेल की, मासिक पाळी शाप नाही. याबाबत मनात कोणतीही शंका बाळगता कामा नये, असं करीना कपूरने सांगितलं.
यासाठी मुलींसोबतच मुलांमध्ये देखील मासिक पाळी संदर्भातील मतपरिवर्तन होण्याची गरज आहे, असे सांगून करीना म्हणाली की, जोपर्यंत मुलांचं याबाबत मतपरिवर्तन होत नाही, तोपर्यंत मुलींच्या अडचणी सोडवता येणार नाहीत.
यासाठी सरकारने प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बनवण्याचं आवाहन करुन, प्रत्येक मुलीची ती वैयक्तिक गरज असल्याचं करीनाने नमूद केलं. जेणेकरुन ती तिच्या वैयक्तिक समस्यांसदर्भात जागरक राहू शकेल.
करीना पुढे म्हणाली की, मासिक पाळीसंदर्भात युनिसेफने एक मोहीम सुरु केली आहे. यासाठी त्यांनी माझी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर या नात्याने मी संपूर्ण देशभर फिरत आहे. आजपर्यंत या संदर्भात जे काही काम झाले आहे त्याचा नक्कीच फायदा होत आहे.
आज अनेक मुली मासिक पाळी आणि लैंगिक विषयावर बोलण्यास घाबरतात. वास्तविक, यावर जाहीर चर्चा होण्याची गरज असल्याचं करीनाने सांगितलं.
मासिक पाळी स्वच्छता अभियानासंदर्भात तिने लखनौमधील लॉ मार्टिनिअर स्कूलच्या विद्यर्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी आणि कन्नौजच्या खासदार डिंपल यादव उपस्थित होते. यावेळी करीना म्हणाली की, महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात लखनौमधून आवाज उठवला, तर तो संपूर्ण देशभर ऐकला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -