बर्मिंगहॅम : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-बांगलादेश सामन्याआधी बांगलादेशींकडून टीम इंडियाची प्रतिमा मलिन करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. यावेळी त्याचं लक्ष्य ठरला तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. हद्द म्हणजे आयसीसीचं फेक ट्विटर हॅण्डलही तयार करण्यात आलं.
विराट कोहलीने बुधवारी सामन्याचे पंच कुमार धर्मसेना यांना रात्री 8.25 वाजता कॉल केला. दोघांमध्ये आठ मिनिटांचं संभाषण झालं. आयसीसी त्याचा कॉल ट्रेस करत होती. याचा परिणाम म्हणजे आयसीसीने विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीतील उर्वरित सामन्यातून निलंबित केलं, असं दावा बांगलादेशी चाहते सोशल मीडियावर तयार केलेल्या पेजवर करत आहे.
या पेजमध्ये बीडीन्यूज24 डॉट कॉमच्या हवाला देण्यात आला आहे. पण याबाबत एबीपीने बीडीन्यूज24 डॉट कॉमला संपर्क साधला असता, त्यांनी हा दावा फेटाळला.
आयसीसीच्या बनावट ट्विटर अकाऊंटवर सेमीफायनलआधीच विराट कोहली स्पर्धेतून बाहेर झाल्याचं ट्वीट करण्यात आलं आहे. ही बाब बांगलादेशमध्ये व्हायरल झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज उपांत्य सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल. या सामन्याला आज दुपारी तीन वाजता सुरुवात होणार आहे. भारताने जर आज बांगलादेशला हरवलं तर क्रिकेट रसिकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी बघायला मिळेल.
संबंधित बातम्या
बांगलादेशपासून भारताला हे 5 धोके
सेमीफायनलच्या महामुकाबल्यात भारत-बांगलादेश आमनेसामने
फायनलमध्ये कुणाशी खेळायला आवडेल? पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर
आता भारताकडून हरण्यासाठी तयार राहा, ऋषी कपूर यांच्या पाकला शुभेच्छा