मध्य प्रदेशातील गुणा येथील आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्यावर व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं.
''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले.
पन्नालाल शाक्य यांनी विराट आणि अनुष्काला पैशाचा सदुपयोग करण्याबाबत सल्लाही दिला. ''विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे'', असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या :