राजकोटच्या मैदानात टीम इंडिया हरली, त्यामुळे साहजिकच विराट कोहलीच्या 29 व्या वाढदिवसाच्या आनंदावर थोडंसं विरजण पडलंय. पण गेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत विराट कोहलीने एक फलंदाज, एक कर्णधार आणि एक स्पोर्टस ब्रँड म्हणून गाठलेली उंची आपल्याला कधीच नाकारता येणार नाही.
वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तो सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर या यादीत विराटचा नंबर लागतो. शिवाय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 9 हजार धावा ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
विराट कोहली हा क्रिकेटमधील प्रत्येक विक्रमाला गवसणी घालणारा फलंदाज आहे. सर्वाधिक शतकं, सर्वाधिक वेगवान धावा, स्पोर्ट्स ब्रँड, यशस्वी कर्णधार आणि कमी वयात एवढी उंची गाठणारा ता जगातील एकमेव फलंदाज असावा.