ट्रायम्फ नाईट्सनं शिवाजी पार्क लायन्सवर तीन धावांनी सनसनाटी मात करुन, मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
शिवाजी पार्क लायन्स या उपविजेत्या संघाचा मेण्टॉर या नात्यानं पदक स्वीकारण्यासाठी विनोद कांबळी व्यासपीठावर आला, त्यावेळी सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडुलकर ते पदक विनोदच्या गळ्यात घालेल अशी तजवीज केली.
सचिनकडून सदर पदक स्वीकारताच विनोद कांबळीने चटकन खाली वाकून त्याला नमस्कार केला. मग सचिननं विनोदलावर उठवून आलिंगन दिलं.
दोन जुन्या दोस्तांमधलं ते प्रेम मुंबईच्या क्रिकेटरसिकांना सुखावणारं होतं.
8 वर्षांनी एकत्र
क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सचिनने मला मदत केली नाही, असा आरोप विनोद कांबळीने जुलै 2009 मध्ये एका टीव्ही शोमध्ये केला होता. त्यानंतर बालपणीच्या या मित्रांमध्ये दुरावा आला होता. मात्र गेल्यावर्षी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एका मंचावर आले. सचिन आणि विनोद ही जोडी गेल्या वर्षी 8 वर्षांनी एकत्र दिसले.
लक्षात राहणारी जोडी
सचिन आणि कांबळी एकत्र शिकले. इतकंच नाही तर दोघांचे प्रशिक्षकही एकच होते, ते म्हणजे रमाकांत आचरेकर. हे दोघेही मुंबई आणि टीम इंडियासाठी एकत्र खेळले. शालेय क्रिकेट स्पर्धेत या दोघांनी नाबाद 664 धावांच्या पार्टनरशिपचा विक्रम रचला होता, जो बरीच वर्ष कायम होता.
क्रिकेटच्या मैदानावरील सचिन आणि विनोदची जोडी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. या जोडीनं शालेय क्रिकेट स्पर्धेपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत बरेच विक्रम रचले. सचिनचा क्रिकेट प्रवास प्रदीर्घ होता. पण विनोदचं क्रिकेट करिअर फारसं पुढे जाऊ शकलं नाही.
संबंधित बातम्या
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीची नवी इनिंग
सचिनमुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!