WWE News: डब्लूडब्लूईच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. डब्लूडब्लूई अध्यक्ष विन्स मॅकमहन (Vince McMahon) यांनी निवृत्तीची घोषणा केलीय. विन्स मॅकमहन हे 77 वर्षाचे असून ते डब्लूडब्लूईचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी संभाळत होते. डब्लूडब्लूईला जगभरात प्रसिद्ध मिळवून देण्यात विन्स मॅकमहन यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून आपण डब्लूडब्लूईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिलीय. 


मॅकमहन काही तासापूर्वी एक ट्विट केलंय. ज्यात त्यांनी असं म्हटलंय की, "मी 77 वर्षांचा आहे आणि आता डब्लूडब्लूईच्या अध्यक्ष आणिमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याची वेळ आली आहे. माझ्यासाठी इतक्या वर्षांचा हा एक अद्भुत प्रवास होता, जिथे आम्ही डब्लूडब्लूईला एका नवीन स्तरावर नेलं. मी माझे कुटुंब, चाहते आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. चाहत्यांनी डब्लूडब्लूईला त्यांच्या घरात जागा दिली. दर आठवड्याला आमच्यासाठी वेळ काढला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या जागतिक प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. विविध देशात डब्लूडब्लूईच्या अनेक सुपरस्टार्सनं मोठी प्रसिद्धी मिळवली, जी त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी होती.


विन्स मॅकमहनचं ट्वीट-



डब्लूडब्लूई पुढचा अध्यक्ष कोण? 
विन्स मॅकमहनच्या निवृत्तीनंतर डब्लूडब्लईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात येईल? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, विन्स मॅकमहनची मुलगी स्टीफनी मॅकमहनकडं डब्लूडब्लूईचं अध्यक्षपद सोपवलं जाऊ शकतं, ती दिर्घकाळापासून डब्लूडब्लूईचं कामकाज पाहत आहे. 


विन्स मॅकमहनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
विन्स मॅकमहननं लैंगिक अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी गेल्या 16 वर्षात 12 मिलियन डॉलर खर्च केले आहेत, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या अहवालात केला होता. हा वाद सरू असताना विन्स मॅकमहननं डब्लूडब्लूईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.



हे देखील वाचा-