Monkeypox In The US : अमेरिकेमध्ये (US) मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा असून लहान मुलामध्ये (Monkepox in Children) पहिल्यांदा मंकीपॉक्स विषाणूची लक्षणं आढळली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं असून बायडन प्रशासन आरोग्य आणीबाणी लागू करण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्नियामधील दोन लहान मुलांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची लक्षणं आढळली आहेत. यामध्ये दोन लहान मुलांमधील एक अमेरिकेचा रहिवाशी आणि एका इतर देशांमधून आलेल्या नवजात बाळाचा समावेश आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने 22 जुलै रोजी या संदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (CDC) सांगितलं आहे की, अमेरिकेत मंकीपॉक्स विषाणू पहिल्यांदा लहान मुलामध्ये आढळला आहे. अमेरिकेतील एका रहिवासी लहान मुलाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. तर एका प्रवाशी नवजात बाळामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळली आहेत. ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित नाहीत. हा घरगुती संक्रमणाचा (Household Transmission) परिणाम असू शकतो. सध्या या दोन्ही मुलांची (Children) प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
यादरम्या मंकीपॉक्सचा संभाव्य धोका पाहता बायडन प्रशासन सतर्क झालं आहे. अमेरिकन सरकार येत्या काळात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मंकीपॉक्स विषाणूंच्या रुग्णांची संख्या 2 हजार 800 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आहे.
जगभरात मंकीपॉक्सच्या 14000 हून अधिक रुग्णांची नोंद
मंकीपॉक्समुळे फ्लू सारखी लक्षणं आणि त्वचेवर जखमा होतात. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील बाहेरील देशांमध्ये, मंकीपॉक्सच्या नव्याने नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवलेल्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात पसरत असल्याचं समोर आलं आहे. हा रोग प्रामुख्याने संपर्कातून पसरतो. 2022 वर्षात आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 14,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहेत, तर आफ्रिकेत पाच जणांचा मंकीपॉक्स विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkeypox Case : केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
- Monkeypox : मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14,000 रुग्णसंख्या आफ्रिकेत पाच जणांचा मृत्यू; WHO ची माहिती
- Covid-19 : कोरोनाचा धोका वाढताच, कोविड19 ला गांभीर्याने घ्या : WHO चा इशारा