मुंबई : घाटाचा राजा या उपाधीनं ओळखले जाणारे महाराष्ट्राचे सायकलवीर अशोक खळे यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 64 वर्षांचे होते.
गेल्या रविवारी 5 नोव्हेंबरला सकाळी मानखुर्द येथे झालेल्या अपघातात खळे गंभीररित्या जखमी झाले होते. ते दादरहून नेहमीप्रमाणे खोपोलीच्या दिशेनं निघाले होते. पण मानखुर्दचा फ्लायओव्हर उतरल्यानंतर एका कारशी झालेल्या टकरीत खळे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या अपघातात मेंदूला झालेल्या ईजेमुळं ते बेशुद्धावस्थेत होते. खळे यांनी मृत्यूशी सहा दिवस दिलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली.
मुंबई-पुणे सायकल शर्यतीदरम्यान खंडाळ्याचा घाट सर्वात वेगानं पार करण्यासाठी खळे यांची ख्याती होती. त्या कामगिरीसाठी खळे यांना दोनवेळा घाटाचा राजा किताबानं गौरवण्यात आलं होतं. 1979 सालच्या राष्ट्रीय सायकलिंगमध्ये खळे हे रोड रेसचे विजेते ठरले होते.
'घाटाचा राजा' अशोक खळे यांचं मुंबईत निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2017 05:57 PM (IST)
5 नोव्हेंबरला सकाळी मानखुर्द येथे झालेल्या अपघातात खळे गंभीररित्या जखमी झाले होते. ते दादरहून नेहमीप्रमाणे खोपोलीच्या दिशेनं निघाले होते. पण मानखुर्दचा फ्लायओव्हर उतरल्यानंतर एका कारशी झालेल्या टकरीत खळे यांना गंभीर दुखापत झाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -