मुंबईतील गणेशभक्तांच्या उत्साहाला विरुचा सलाम
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 05:38 PM (IST)
नवी दिल्लीः भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने मुंबईकरांच्या गणपतीच्या उत्साहाला दाद दिली आहे. विरुने गणपतीसोबत फोटो शेअर करत मुंबई नगरीतील गणेशोत्सव एक आगळा वेगळा उत्सव असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत गणेशोत्सवाची तयारी अनेक महिने अगोदरच सुरु होते. तसंच जसा गणेशोत्सव जवळ येईल तसा बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहचतो. हेच पाहून विरुनेही मुंबईकरांच्या भक्तीला दाद दिली आहे. https://twitter.com/virendersehwag/status/772846731365117952 मुंबई नगरीत गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह जबरदस्त आहे. कारण प्रत्येक भक्त मनापासून गणेशाची पूजा करतो, असं विरुने म्हटलं आहे. तसंच विरुने बाप्पासोबतचा फोटोही शेअर केला आहे.