नवी दिल्लीः डॉ. उर्जित पटेल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी निवृत्ती घेतल्यानंतर उपगव्हर्नर असलेले उर्जित पटेल यांची राजन यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली.


 

उर्जित पटेल हे भारताच्या आर्थिक व्यवस्थेला नवा चेहरा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख होते. आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून विराजमान झाल्यानंतर महागाई दर कमी करणं, व्याज दर कमी करणं हे उर्जित पटेल यांच्यासमोरील सर्वात मोठी आव्हानं असणार आहे.

 

उर्जित पटेल 2013 पासून आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. प्रसिद्ध अर्थतज्ञ अशी त्यांची ख्याती आहे. अमेरिकेतील येले विद्यापीठातून उर्जित पटेल यांनी पीएचडी केली आहे. तर ऑक्स्फर्ड विद्यापीठातून एम.फील., लंडन विद्यापीठातून बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.