Vinod Kumar loses Bronze : टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताचे विनोद कुमार यांनी चमकदार कामगिरी करताना कांस्य पदक अर्थात कांस्यपदक जिंकले होते. पण आता भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, विनोद कुमारने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये थाळीफेकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. मात्र, आता सामन्याचा निकाल आता रद्द करण्यात  आला आहे. थाळीफेकीत F52 गटात कांस्यपदक जिंकले होते, परंतु या कॅटगरीसाठीच्या नियमात ते मोडत नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धींनी नोंदवला. परंतु तपासानंतर त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला.


विनोद कुमारने थाळी फेकच्या F52 प्रकारात 19.98 मीटर थ्रोसह आशियाई विक्रम आपल्या नावे केला आहे. विनोदने सहा प्रयत्नांमध्ये (Attempt) 17.46 मीटर फेकून सुरुवात केली. यानंतर, त्याने 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर आणि 19.81 मीटर फेकले. त्याचा पाचवा थ्रो 19.91 मीटरचा सर्वोत्तम थ्रो मानला गेला होता. यासह त्याने आशियाई विक्रम आपल्या नावावर केला होता. भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई केली आहे.