चेन्नई : आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. चेन्नईत होणारा 10 तारखेचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तामिळनाडूतील काही राजकीय संघटनांनी केली आहे.

''कावेरी पाणी वाटप लवादाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत चेन्नईत आयपीएल सामने खेळवण्यात येऊ नयेत, असं निवेदन चेन्नईच्या पोलीस आयुक्तांना दिलं आहे. तरीही सामने खेळवण्यात आल्यास मैदानात जाऊन आंदोलन करु,'' असा इशारा टीव्हीकेचे नेते टी वेलमुरुगन यांनी दिला. दरम्यान, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची आपली इच्छा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर चेन्नई पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभाग घेणार असून 10 एप्रिलचा सामना हा घरच्या मैदानातील पहिलाच सामना असेल.

दरम्यान, 7 एप्रिलला मुंबईच्या वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होणार आहे. मात्र घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्याच सामन्याबाबत शंकेचं वातावरण निर्माण झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.

संबंधित बातमी :

कावेरी निकाल : तामिळनाडूला 177 टीएमसी पाणी