ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला १३ जूनपासून लॉर्डसवर सुरुवात होत आहे. केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच मोठा दौरा आहे.
बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर टिम पेननं ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळं वन डे संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती होणं अपेक्षित होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यात एकमेव ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळणार आहे. त्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी अॅरॉन फिन्चची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर एका वर्षांची बंदी घातली आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाची नव्या जोमानं संघबांधणी करण्याचंही आव्हान लँगरवर राहिल.