सांगली : नगरसेवक दादा सावंत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सांगलीतील कुख्यात गुंड सचिन जाधव उर्फ टारझन याला तडीपार करण्यात आलं आहे. त्याच्यावर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मिरजेचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांना दिली होती. त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी या याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.
सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
सांगली पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत सचिन जाधव उर्फ टारझन याच्यावर कारवाई करण्यात आली.
सचिन टारझनवर हत्या, मारामारी, दहशत पसरवणे, खंडणी यांसारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सांगलीतील कुख्यात गुंड टारझन दोन जिल्ह्यातून तडीपार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 May 2018 08:51 PM (IST)
टारझनवर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मिरजेचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांना दिली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -