Thomas Cup Final 2022 : भारतीय पुरुष संघाने थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात (Thomas-Uber Cup Semifinals) भारताने डेन्मार्कचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले. एतिहासिक थॉमस चषकात भारताने डेन्मार्कचा 3-2 च्या फराकाने पराभव केला. थॉमस स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. तसेच स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे.


डेन्मार्कविरोधात भारताच्या पुरुष संघाने पहिल्या मिनिटांपासूनच आक्रमक खेळ केला.  एचएस प्रणॉयने रासमुस गेमकेवर 13-21, 21-9, 21-12 अशा सरळ सेटमध्ये मात करून नाट्यमय पुनरागमन पुनरागमन केले. प्रणॉयच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने थॉमस चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. थॉमस चषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केला. सात्विक-चिराग, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांच्या विजयी मोहिमेच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्यांदाच थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. खास म्हणजे, आता थॉमस चषक 2022 मध्ये भारताचे किमान रौप्य पदक निश्चित झालेय.  






गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने पाच वेळचा चॅम्पियन मलेशिया संघाचा 3-2 असा पराभव केला. एका वेळी 2-2 अशी बरोबरी होती. यानंतर एचएस प्रणॉयने निर्णायक सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला.  थॉमस चषकाच्या इतिहासात भारतीय संघ यापूर्वी 1952, 1955 आणि 1979 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता.


हे देखील वाचा-