IND vs SA Centurion Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाने (IND vs SA Centurion Test) कसोटी मालिका खेळायला सुरुवात केली आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे, ज्यामध्ये यजमान संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि अवघ्या 121 धावांत 6 गडी बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या 8 विकेट घेतल्या, पण केएल राहुलला बाद करता आले नाही.






केएल राहुलची शानदार खेळी 


यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने (KL Rahul) आपल्या शानदार खेळीने टीम इंडियाच्या अडचणी तर कमी केल्याच पण अत्यंत कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर टीम इंडियाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुल नाबाद 70 धावांवर होता आणि टीम इंडियाची धावसंख्या 8 विकेट गमावून 208 धावा होती. केएल राहुलच्या या खेळीने अनेक क्रिकेट चाहते, तज्ज्ञ, माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांना आनंद दिला आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही त्यात समावेश आहे. भारताच्या या दोन माजी दिग्गजांनी स्टार स्पोर्ट्सवर केएल राहुलचे खुलेपणाने कौतुक केले.






केएल राहुलबद्दल गावसकर काय म्हणाले?


केएल राहुलची खेळी पाहिल्यानंतर सुनील गावसकर म्हणाले की, "आम्हाला त्याच्या गुणांबद्दल खूप दिवसांपासून माहिती आहे, पण आता ते गुण गेल्या 8-9 महिन्यांत पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून आयपीएलमधील भयंकर दुखापतीमधून पुनरागमन केल्यापासून आम्हाला एक वेगळा केएल राहुल पाहायला मिळाला आहे. हाच राहुल आहे ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो, आणि त्याला पाहण्यात खूप मजा येते. मी कॉमेंट्रीमध्ये असेही म्हटले होते की त्याचे हे अर्धशतक माझ्यासाठी शतकासारखे आहे."






केएल राहुलबद्दल काय म्हणाले रवी शास्त्री?


सुनील गावसकर व्यतिरिक्त टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, "त्याने फलंदाजी सोपी केली आहे असे वाटत होते. त्याचे फूटवर्क आणि संतुलन खरोखरच उत्कृष्ट होते. त्याची ही खेळी देखील सिद्ध करते की " कसोटी क्रिकेटमध्ये हा क्रमांक (क्रमांक 6) त्याच्यासाठी योग्य आहे. मला वाटते की तो मधल्या फळीत भारतासाठी खूप धावा करेल."


इतर महत्वाच्या बातम्या