Numerology 27 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 च्या काही लोकांसाठी आर्थिक आघाडीवर परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे, परंतु हात थोडा आखडता घ्या. कोणत्याही परिस्थितीत खर्च वाढू देऊ नका. घरगुती बजेटचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी जाण्याचा बेत आखता येईल.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज लांबचा प्रवास करणाऱ्यांना चांगला वेळ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर सखोल संशोधन करा, तुम्हाला तुमचे पैसे कुठे गुंतवायचे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. केवळ सट्टेबाजीवर पैसे गुंतवण्याचा हा दिवस नाही.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या लोकांनी आज पैशाच्या बाबतीत थोडे सतर्क राहावे, आज नुकसान होण्याची चिन्हे आहेत, जर तुम्ही अजून प्रयत्न केले नसतील तर शैक्षणिक क्षेत्रात विशेष अपेक्षा ठेवू नका, आधी मेहनत करा.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यापैकी बहुतेकांसाठी दिवस चांगला जाईल. जर दीर्घकाळ कोणतेही काम होत नसेल, तर आज ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमची टीम सुधारा आणि लोकांशी नेटवर्कमध्ये राहा.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज मूलांक 5 असलेले लोक लाँग ड्राइव्हवर जाऊ शकतात, यामुळे तुमच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबीबाबत तुमचा विचार बदलावा लागेल, हे अवघड आहे, पण अशक्य नाही. शैक्षणिक आघाडीवर पुढे जाण्यासाठी अडथळे दूर करणे ही काळाची गरज आहे.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. जे लोक आपले उत्पन्न वाढवण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता प्रतीक्षा करावी लागेल, परंतु उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनावश्यक ताण घेऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 चे लोक आज थोडे उदास राहतील, काही चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे प्रलंबित काम पूर्ण करून आज ऑफिसमध्ये व्यस्त राहाल. टीमवर्क तुम्हाला ऑफिसमध्ये यश मिळवून देईल.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते परत कराल. आज तुम्ही कोणत्याही कौटुंबिक विषयाचा अनावश्यक ताण घेऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आज तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तर तुमचा निर्णय यशस्वी होईल. ऑफिसमधील काही लोक तुमच्या विरोधात आहेत, त्यामुळे सावध राहा. टीम मीटिंगचा एक भाग व्हा आणि तुमची मते स्पष्टपणे व्यक्त करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shani 2024 : तीन महिन्यांनंतर शनिदेव नक्षत्र बदलणार; 'या' 4 राशींना होणार मोठा फायदा