सचिनने आपला वाढदिवस 'असा' साजरा केला...
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2016 04:56 AM (IST)
मुंबई : भारतासह संपूर्ण जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस. त्या निमित्ताने जगभरातून विक्रमवीर सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकरने वांद्र्यातील एमआयजी क्लब मैदानावर आपला वाढदिवस साजरा केला. मेक अ विश च्या मुलांसोबत क्रिकेट खेळत त्याने बर्थडे सेलिब्रेट केला. हा व्हिडिओ सचिनने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे. ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, युवराज सिंग, बॉक्सर विजेंदर सिंग, शरद पवार, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांनी ट्विटरवरुन सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. https://twitter.com/SrBachchan/status/723966273248321537 https://twitter.com/YuviWorld/status/723961585866256384 https://twitter.com/harbhajan_singh/status/723971131913457664 https://twitter.com/boxervijender/status/723960909341798401 https://twitter.com/PawarSpeaks/status/724063657848639488 https://twitter.com/DuttYogi/status/723945217691283457