मुंबई : ऑगस्टमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अँबेसेडर म्हणून झालेल्या सलमान खानच्या निवडीवर कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अँबेसेडरचं नेमकं काय काम असतं, असा प्रश्न विचारत देशातील जनतेला वेडं बनवण्याचं काम करु नका असा संताप त्यानं ट्विटरवर व्यक्त केला आहे.

 

https://twitter.com/DuttYogi/status/723856610959974400

 
सलमानच्या खेळातील योगदानावरही योगेश्वर दत्तने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सलमानने कुठेही जाऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करावं, या देशात त्याला अधिकार आहेच, मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्याची ऑलिम्पिक ही जागा नाही, असंही त्याने एका ट्विटरवरुन टीका करण्याला उत्तर देताना म्हटलं आहे.

 

https://twitter.com/DuttYogi/status/723917297417474049

 
पीटी उषा, मिल्खा सिंगा यासारख्या मोठ्या क्रीडापटूंनी कठीण काळात देशासाठी मेहनत घेतली. मात्र खेळाच्या क्षेत्रात या अॅम्बेसेडरने काय मेहनत घेतली, असा सवालही त्याने विचारला आहे.

 

https://twitter.com/DuttYogi/status/723918030753902594

 
एका ट्विटर युझरने योगेश्वरला 2012 मध्ये हरियाणाचा आरोग्यदूत केल्यावर सवाल उपस्थित केला. तुम्ही डॉक्टर होतात, की एड्सवर औषध विकसित केलंत, असा प्रश्न त्याने विचारला. यावर उत्तर देताना मी खेळाडू आहे. दारु पित नाही, सिगरेट ओढत नाही, म्हणून आरोग्यदूत केलं, आता तू सांग सलमानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत का केलं, असा प्रतिप्रश्न केला.

 

https://twitter.com/DuttYogi/status/723961029026295809

 
हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातला योगेश्वर हा भारताचा कुस्तीपटू आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली असून सध्या तो जॉर्जियामध्ये ट्रेनिंग घेत आहे.