याचप्रकरणी डॅरेन लिमन यांनी मान्य केलं आहे की, स्मिथ आणि वॉर्नरने खूप मोठी चूक केली आहे.
पत्रकारांशी बोलताना लिमन म्हणाला की, 'बॉल टेम्परिंगप्रकरणी त्यांना गंभीर शिक्षा देण्यात आली आहे. त्यांनी प्रचंड मोठी चूक केली आहे. पण ते लोकं वाईट नाहीत. कोच म्हणून मला त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी फार वाईट वाटत आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण आयुष्यात कधी ना कधी चूक करतोच.'
'त्यांनी चूक केली, सर्वच करतात, मी देखील चुका केल्या आहेत. ते तरुण आहेत त्यामुळे मला आशा आहे की, लोकं त्यांना दुसरी संधी नक्की देतील. येत्या काळात आम्हाला आमच्या खेळात बरेच बदल करावे लागतील.' असंही लिमन यावेळी म्हणाले.
दरम्यान, जगभरातून स्मिथ आणि वॉर्नरवर टीका होत असताना कोच लिमन यांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.