स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2018 08:37 AM (IST)
बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरील एक वर्षाचा बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे.
मुंबई : बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरील एक वर्षाचा बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य निर्णय घेतल्याचं सचिननं आपल्या ट्विटरवरुन म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली आहे. या संपू्र्ण प्रकरणावर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. 'क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असं माझं मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.' असं ट्वीट सचिननं केलं आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीनही खेळांडूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घातली असली तरीही त्यांना क्लब क्रिकेट खेळण्याच परवानगी देण्यात आली आहे. संबंधित बातम्या : स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड! VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा! 'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई