Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालच्या कौशल्य आणि क्षमतेचे कौतुक केले. प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे त्याने सांगितले. त्याची फलंदाजी पाहता त्याच्यात फारसा कमकुवतपणा आहेत असे वाटत नसल्याचे मॅक्सवेलने म्हटले आहे. 


40 हून अधिक कसोटी शतकं झळकावून इतिहास रचू शकतो


इतकंच नाही तर यशस्वी 40 हून अधिक कसोटी शतकं झळकावून इतिहास रचू शकतो असंही तो म्हणाला. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करत त्याने संघातील आपले स्थान पक्के केले. मॅक्सवेलने ‘द ग्रेड क्रिकेटर’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, “तो (जैस्वाल) असा खेळाडू आहे जो 40 हून अधिक कसोटी शतके झळकावेल आणि काही वेगळे विक्रम करेल. त्याच्याकडे वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता आहे.” यशस्वी जैस्वालने पर्थ कसोटीत शतक झळकावून अनेक विक्रम केले. त्याने ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे.





त्याच्या कारकिर्दीतील हे चौथे कसोटी शतक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशस्वीने त्याच्या चारही शतकी खेळींमध्ये 150 हून अधिकचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 15 कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो आशियाई फलंदाज आहे. 15 कसोटी सामन्यांनंतर यशस्वीच्या खात्यात 58.07 च्या सरासरीने 1568 धावा जमा आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या